नोव्हेंबर २०२२ मध्ये जगाची लोकसंख्या आठशे कोटी (आठ बिलियन) झाली. १९२७ मध्ये म्हणजे सुमारे १०० वर्षांपूर्वी ती दोनशे कोटी (दोन बिलियन) होती आणि फक्त ११ वर्षांपूर्वी ती सातशे कोटी होती. भारताबद्दल बोलायचं तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आपण सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होणार आहोत आणि लोकसंख्येत चीनला मागे टाकणार आहोत.
लोकसंख्या विस्फोट हा शब्दही आता वापरून वापरून गुळगुळीत झाला आहे आणि त्याचं काही वाटेनासं झालं आहे. ह्या विस्फोटामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, निर्वनीकरण आणि कमी होणारी जैव-विविधता हे सगळं इतकं आपल्या आवाक्याबाहेरचं वाटतं, की आपण बधिर आणि निष्क्रिय झालो आहोत.
आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही का? आपण घेत असलेल्या प्रत्येक घासाचा आपल्या आरोग्याशी आणि पृथ्वीच्या आरोग्याशीही संबंध आहे. म्हणूनच ‘वदनी कवळ घेता’ विचार करायला हवा. म्हणून हा ब्लॉग सुरू करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा